|
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमातंर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी चार गांवाकरिता एक या प्रमाणात महा ई सेवा केंद्र सुरू करून सर्व जनतेला विनासायास व कमी श्रमात खाजगी संस्थेकडून सेवा उपलब्ध करून देण्याची योजना असून हे धोरण साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने 27 केंद्रीय, राज्य व एकात्मिक मिशन मोड प्रकल्पासह 8 पुरक योजना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या आहेत. सदरील योजनेतील तीन प्रमुख पायाभूत योजना खालील आहेत. 1. स्टेट वाईड एरिया नेटवर्क2. स्टेट डाटा सेंटर3. कॉमन सर्व्हिस सेंटर ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय, खाजगी व सामाजिक सेवा जास्तीत जास्त पारदर्शक व एकात्िमक संगणकीय पध्दतीने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Information Technology Act, 2000 Information Technology (Amendment) Act, 2008 Information Technology (Certifying Authorities) Amendment Rules, 2009 |
|
|---|---|
| आयटीसंबंधी शासन निर्णय/परिपत्रक | |